पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेचा अक्कलकुवा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करून तहसीलदारांना निवेदन दिले.
.
या दहशतवादाला खतपाणी देऊन त्यांना आश्रय देणाऱ्या देशाची चौकशी व कारवाई करून दहशतवाद्यांचा खात्मा करावा, अशी मागणी केली. या घटनेचा शिवसेनेच्या वतीने आ. आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात तहसीलदार विनायक घुमरे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
निवेदन देतेवेळी या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती यावेळी शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, युवा सेना लोकसभा प्रमुख ललित जाट, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, तालुका संघटक आनंद वसावे, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, खापर शहर प्रमुख रवी पाडवी, डिंपल चौधरी, किरण चौधरी, आमदार आमश्या पाडवी यांचे स्वीय सहायक रवींद्र गुरव, सरपंच दिनेश वसावे, सुधीरकुमार ब्राम्हणे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख, हुजेफा बलोच, चालक गणेश वळवी उपस्थित होते.