उन्हाळा म्हटलं की आंबा. फळांचा राजा म्हणून आंब्याला पसंती दिली आहे. आंब्याचा मोहक पणा, गोडवा आपल मन जिंकणारा आहे. पण अनेक मधुमेहींना आंबा खावा की नाही? हा प्रश्न असतो. अशावेळी डॉ भाग्येश कुलकर्णी डायबिटिस मधुमेहींनी आंबा खावा आणि तो कशा पद्धतीने खावा यांच मार्गदर्शन करतात.
डॉक्टर काय म्हणाले?
डॉ. भाग्येश कुलकर्णींनी सांगितलेल्या पॉडकास्टमध्ये कोणत्या मधुमेही रुग्णांनी आंबा खावा यावर सांगितलं आहे. ज्या रुग्णांची शुगर ही 200 च्या आत असेल. तसेच HBA1C 8असेल ते आंबा खाऊ शकतात. या मधुमेहींच्या आरोग्याच्या सर्व गोष्टी अंडर कंट्रोल असेल तर आंबा खाण्यास काहीच हरकत नाही.
डॉ. भाग्येश कुलकर्णी काय सांगतात?
आंबा कसा खावा?
डॉ. भाग्येश कुलकर्णींनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमेही आंबा खाऊ शकतो. पण तो खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे. आंबा हा हापूस जातीचा असावा तसेच तो पूर्ण पिकलेला असावा. तसेच महत्त्वाचे म्हणजे आंबा पूर्ण खाताना तो चिरुन खावा आणि त्यातील दोन फोडी या साली सकट खाव्यात.
आंबा कधी खावा
आंब्याला सुपर फ्रुट म्हटलं जातं. कारण आंबा हिलिंगचं काम अतिशय चांगल करतं. तसेच आंबा जर विशिष्ट पद्धतीने खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही. आंबा नाश्ता अगोदर खावा. जर जेवताना आंबा खायचा असेल तर तो जेवणाअगोदर खावा. आंब्याचा GI हा 51 ते 56 आहे. त्यामुळे हे फळ मधुमेहींनी खाल्ले तरी त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही. आंब्यातील गोडवा शरीरासाठी पुरक आहे. आंब्याचा गोडवा Test Bud ला प्लिझंट करतो.
आंबा कशा स्वरुपात खाल?
मधुमेहींना जरी आंबा खाण्यास डॉक्टर परवानगी देत असले तरीही तो खाताना काळजी घेणे गरजेची आहे. आंबा खाताना वेगवेगळ्या स्वरुपात खाऊ शकता. जसे की, सलाडच्या स्वरुपातही खाऊ शकता. तसेच आंबा खाताना तो साली सकट खावा ज्यामुळे फायदा होतो. पूर्णपणे आंब्याचा सलाड न बनवता स्प्राऊट्सच्या सलाडमध्ये, फळांच्या सलाडमध्ये आंब्याच्या फोडी टाकू शकता. जेणे करुन आंबा खाल्याच समाधानही मिळेल आणि तो गोडवाही चाखता येईल.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)