पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. पण त्यानंतरही भाजप नेते व मंत्री स्वतःच्या सत्कार सोहळ्यांत व्यस्त आहेत. असे हारतुरे घेताना त्यांना लाज कशी वाटत नाही? अशी संतप्त टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अ
.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी भयंकर अतिरेकी हल्ला झाला. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांसह 26 पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपरोक्त टीका केली आहे. ते म्हणाले, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?
26 तारखेला अमरावतीत आहे सत्कार
अतुल लोंढे पुढे म्हणाले, अमरावती मध्ये 26 तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा सत्कार होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख अजून विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे. ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत.
परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, असे अतुल लोंढे म्हणाले.
हे ही वाचा…
कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा:अंतिम सुनावणीपर्यंत अटकेपासून अभय; चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा, पोलिसांना आदेश
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर
बदलापूर एन्काऊंटर प्रकरण SIT ला वर्ग का केले नाही?:हायकोर्टाचा सवाल; महाराष्ट्र पोलिसांवर अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी बदलापूर एन्काऊंटर प्रकरण विशेष तपास पथकाला (SIT) अद्याप का वर्ग केले नाही? असा संतप्त सवाल करत महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणी अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला. कोर्टाच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांत मोठी खळबळ माजली आहे. वाचा सविस्तर