Nana Patekar : निर्मात्याला मटण खाऊ घालून त्यालाच भांडी धुवायला लावली; नाना पाटेकरांचा ‘हा’ किस्सा माहितीये का? – Pressalert

0


Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्याविषयीचे अनेक किस्से आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावर त्यांचे मीम देखील व्हायरल होतात. दरम्यान, त्यांच्या विषयीचा एक किस्सा अभिनेता परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की नाना पाटेकर हे एकमेव असे अभिनेते होते जे कोणालाही घाबरायचे नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वास देखील तितकाच होता. त्यांनी नाना पाटेकरांचा एक किस्सा सांगितला ज्यात त्यांनी सांगितलं की नाना पाटेकर यांनी एका निर्मात्यांना जेवण खाऊ घातल्यानंतर त्यालात भांडी धुवायला सांगितली होती. 

थेट 1 कोटी मानधनाची केली मागणी

परेश रावल यांनी ही मुलाखत ‘द लल्लनटॉप’ला दिली होती. त्या मुलाखतीत बोलताना परेश रावल त्यांचे जुने मित्र आणि सहकलाकार नाना पाटेकर यांच्याविषयी बोलताना दिसले. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला जिथे नाना पाटेकरांनी ज्या निर्मात्याला जेवू घातलं त्याला भांडी धुवायला सांगितली होती. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं की नाना एक कॅरेक्टर आर्टिस्ट असून त्यांनी एका कलाकारपेक्षा जास्त मानधनाती मागणी केली होती. याविषयी सांगत परेश रावल म्हणाले, ‘नाना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले कॅरेक्टर आर्टिस्ट होते ज्यांनी एका भूमिकेसाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांनी म्हटलं की तेव्हा नाना यांनी थेट इतकी मोठी मानधनाची रक्कम मागितली. तर दुसरीकडे महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता देखील इतकी मोठी रक्कम कशी मागणार म्हणून विचार करत होता. तर नाना यांचा स्क्रीन प्रेझेंस आणि क्रेडिबिलिटी इतकी जबरदस्त होती की निर्माते देखील नाना जेवढं मानधन मागायचे तितकं द्यायचे.’ 

निर्मात्याला भांडी धुवायला सांगितली

परेश रावल यांनी पुढे आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला की नाना यांनी एकदा एका निर्मात्याला त्यांच्या घरी जेवायलं बोलावलं आणि नंतर त्यालाच भांडी धुवायला सांगितली. परेश रावल म्हणाले, ‘एक निर्माता आहे, मी त्याचं नाव घेणार नाही. नानानं एकदिवस त्याला घरी ये असं सांगितलं. त्यानं विचारलं की तू मटन खातोस का? त्यानं खाल्ल. नाना म्हणाला, तू मटन खाल्लस ना? आता जा आणि भांडी धुवून काढ. तो नाना पाटेकर आहे- बाप आहे. तो वेगळा आहे, त्याची मातीच वेगळी आहे. त्यानं एक कोटी रुपये मागितले होते आणि त्यानं खूप मोठी चर्चा झाली होती. महत्त्वाची भूमिका साकारणारे हिंम्मत करत नाहीत आणि नाना पाटेकरनं मागितले आणि घेतले सुद्धा.’  

हेही वाचा : मित्राची हत्या करून 300 तुकडे, मृतदेहासमोर BF सोबत शरिरसंबंध; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक भूतकाळ

परेश रावल यांनी नानांच्या प्रामाणिक आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीचं कौतुक केलं. त्यांनी हेही सांगितलं की, जर नाना त्या इंटरव्ह्यूमध्ये असते तर अजून ते खूप बोलले असते. नाना आणि परेश यांची मैत्री 1994 मध्ये ‘क्रांतिवीर’ पासून आहे. त्यानंतर ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘आंच’, ‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्या दोघांनी एकत्र काम केलं. 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here