बॉलिवूड स्टार्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा सर्वांच्या तोंडी आहेत. आज आपण अशा काही स्टार्सबद्दल जाणून घेणार आहेत. जे गुपचूप प्रेमात पडले, पण जेव्हा ते पकडले गेले तेव्हा मोठा गोंधळ उडाला.
अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा
जेव्हा जेव्हा प्रेमाची चर्चा होते तेव्हा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव सर्वात आधी येते. अक्षयचे नाव प्रियांका चोप्रासोबत जोडले गेले. त्याने प्रियांकासोबत ‘अंदाज’ आणि ‘ऐतराज’ या चित्रपटांमध्ये काम केले. या काळात दोघांमधील जवळीक वाढू लागली. जेव्हा त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला हे कळले तेव्हा तिला खूप राग आला. दोघांमधील संबंध इतके बिघडले होते की अभिनेत्याला प्रियांकापासून दूर राहावे लागल.
श्रीदेवी आणि बोनी कपूर
जेव्हा श्रीदेवी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या आयुष्यात आल्या तेव्हा त्यांचे लग्न झाले होते. पण बोनी कपूर लपून छपून श्रीदेवीच्या प्रेमात पडले, पण त्यांचे प्रेम जास्त काळ लपवू शकले नाही. पण पहिली पत्नी मोना कपूरला या अफेअरबद्दल कळले, त्यानंतर तिने बोनी कपूर यांना घटस्फोट दिला.
सैफ अली खान आणि रोजा
सैफ अली खानने 1991 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी अमृता सिंगशी लग्न केले. लग्न झाल्यानंतरही तो इटालियन मॉडेल रोजा कॅटालानोला डेट करू लागला. जेव्हा अमृताला हे कळले तेव्हा त्यांच्या नात्यात भांडणे वाढू लागली, जी घटस्फोटाचे कारण बनली. 2004 मध्ये सैफ आणि अमृता दोघेही वेगळे झाले.
हृतिक रोशन आणि कंगना
२००० मध्ये हृतिक रोशनने सुझान खानशी लग्न केले होते, परंतु २०१४ मध्ये त्यांचे नाते तुटले आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण कंगना राणौत असल्याचे म्हटले जाते.
रेखा आणि अमिताभ
अमिताभ बच्चन यांचीही कहाणी अशीच आहे. लग्न झाल्यानंतरही रेखाशी त्यांची जवळीक वाढू लागली. जेव्हा त्यांच्या नात्याची बातमी जया बच्चन यांच्या कानावर पडली तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. असे म्हटले जाते की त्यांनी रेखाला ‘बिग बी’ पासून दूर राहण्यास सांगितले होते, त्यानंतर रेखा आणि अमिताभ एकमेकांपासून दूर झाले.