Shahrukh Khan Old Video Over Pahalgam Attack : ‘दहशतवाद्यांचा इस्लाम आमचा इस्लाम नाही’; धर्माची संकल्पना स्पष्ट करत शाहरुख खान म्हणाला… – Pressalert

0


Shahrukh Khan Old Video Over Pahalgam Attack : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कोणत्याही विषयावर बोलतो तेव्हा ते अनेकांना पटतं आणि हुशार असलेल्या कलाकारांपैकी एक अशी त्याची ओळख आहे. नेहमीच विचारलेल्या प्रश्नांना शाहरुख हा हटके पद्धतीनं उत्तर देताना दिसतो. दरम्यान, शाहरुखची आता एक मुलाखत आहे जी पहलगामच्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

शाहरुख खान हा सगळ्या धर्मांना मानतो. फक्त शाहरुख नाही तर त्याच्या कुटुंबातीलं लोकं देखील सगळ्या धर्मांना मानतात. सध्या शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये शाहरुख खाननं इस्लामची संकल्पना आणि परिभाषा काय आहे ते सांगितलं होतं. शाहरुखनं राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की इस्लाममध्ये दहशतवादासाठी जागा नाही. शाहरुख म्हणाला की ‘मी खोटं बोलणार नाही. 2-3 वर्षांपूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की दहशतवाद हा इस्लामच्या संकल्पनेत आहे तर मी त्याला नकारायचो. पण मला आता मला कळलं की हे दहशतवादी ज्या इस्लामचं पालन करत आहेत तो आमचा इस्लाम नाही. तो आमचा धर्मच नाही आहे. कारण आमच्या पवित्र पुस्तक असलेल्या कुरानमध्ये अल्लाहचा जणू आवाज लिहिलेला आहे. जर त्याला आम्ही त्याला आमचा इस्लाम धर्म म्हटलं तर त्यात असा कुठेच उल्लेख केलेलाा नाही.’

इस्लामविषयी शाहरुखचं वक्तव्य

शाहरुख खाननं सूरह अल-माइदाच्या आयत 32 आणि 33 चा उल्लेख करत समजावलं की इस्लाम हा सगळ्यांवर दया करा हे शिकवतो. त्यानं म्हटलं की ‘अल्लाहनं पवित्र कुरानमध्ये म्हटलं आहे की जर कोणी कोणत्या व्यक्तीला ठीक केलं. तर ती व्यक्ती सगळ्या मनुष्य जातीला ठीक करतो आणि जर कोणत्या व्यक्तीला दु:ख देत असेल तर त्यामुळे तो सगळ्या मानव जातीला दुखावतोय.’

दहशतवाद्यांचा इस्लाम आमचा इस्लाम नाही… 

शाहरुखनं पुढे म्हटलं की अल्लाहनं मुस्लीमांना आदेश दिलाय की, ‘कोणत्या प्रकारच्या युद्धातही महिला, मुलं, प्राणीमात्र आणि शत्रूच्या शेतजमिनी, पिकांना नुकसान पोहोचवू नये. जर त्यांनी असं केलं तर त्यांना स्वर्गात नाही तर जो अल्लाह आहे तो त्यांना आणखी वाईट शिक्षा देईल. हा अल्लाहचाच आवाज आहे आणि दुसरं म्हणजे ज्या इस्लामचं पालन ही मंडळी करतात, मला सांगायला फारच वाईट वाटतंय. मुळात मी कोणाच्याही विरोधात जाऊ इच्छित नाही, पण हे मुल्लांनी सांगून ठेवले आहे.’

हेही वाचा : Pahalgam Terror Attack : भारत-पाकिस्तान वादामुळे मायलेकाची होणार ताटातूट; अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्याला…

दरम्यान, शाहरुखच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्ये दिसला. तर लवकरच तो ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2026 मध्ये ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here