नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारावेळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. पूजा सचिन सूर्यवंशी (२९, रा. सद्गुरूनगर, रांजणगाव शे. पु.) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी घाटी पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्य
.
नातेवाइकांच्या माहितीनुसार, मृत पूजा यांना त्यांचे पती सचिन यांनी २२ एप्रिल रोजी प्रसूतीसाठी ममता हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या वेळी डॉक्टरांनी तपासण्या केल्या. आईची आणि बाळाची तब्येत बरी असल्याचे सांगून पूजा यांना प्रसूतीसाठी दाखल करून घेतले. महिलेचे सीझर करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर उपचार सुरू केले. या उपचारावेळी पूजा यांची प्रकृती खालावली. त्यामुळे पूजा यांना घाटी रुग्णालयातील अपघात विभागात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून पूजा यांना २२ एप्रिल रोजी रात्री ११.५५ वाजता मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा घाटी पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
आम्ही योग्य उपचार केले
मी बाहेरगावी होतो. नुकताच आलो आहे. त्या वेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानुसार महिलेवर आम्ही योग्य उपचार केले आहेत. – डॉ. सुदाम चव्हाण, ममता हॉस्पिटल.