.


पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. या घटनेच्या निषेधार्थ शहरात शुक्रवारी २५ एप्रिलला विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाजारपेठांनी कडकडीत बंद पाळला. सकाळपासून संपूर्ण बाजारपेठा बंद राहिल्या. राजकमल चौकात सकाळी १०.३० वाजता आयोजित सभेत मृतकांना दोन मिनिटे मौन श्रद्धांजली अर्पण केली. श्री हनुमान चालिसा पाठही घेतला. या वेळी नागरिकांनी हनुमान चालिसा म्हणत मृतकांच्या आत्म्यांना शांती मिळावी, अशी प्रार्थना केली. त्यानंतर राजकमल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढली. या रॅलीत नागरिक सहभागी झाले होते.
रॅलीत सहभागी विहिंपच्या निवडक पदाधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले. अशा संकटाच्या वेळी आम्ही देशासोबत आहोत. जात, धर्म, पंथ महत्त्वाचे नसून, देश महत्त्वाचा आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेले कृत्य हे भ्याडपणाचे तसेच माणुसकीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळेच श्रद्धांजली सभेत वक्त्यांनी पाकिस्तानवर आगपाखड केली. बहुतेकांनी संताप व्यक्त करीत पाकिस्तान विरोधात तीव्र नारेबाजीही केली. दहशतवादाला खतपाणी घालून सतत भारतातील शांती भंग करणाऱ्या पाकिस्तानला केंद्र सरकारने उर्वरित. पान ४ शहरातील मुख्य बाजारपेठ बंद राहिली. तखतमल तयार पोशाखांचा बाजार, औषधाचा ठोक बाजार, विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने, सराफा बाजार, राजकमल चौक ते गांधी चौक मार्गावरील दुकाने, एवढेच नव्हे तर श्री अंबादेवी मंदिरापुढील हार, पूजा साहित्य, प्रसादांची दुकानेही बंद ठेवण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू असली तरी खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिले. तसेच महानगर चेंबरच्या आवाहनाला सर्वच व्यापारी संघटनांनी प्रतिसाद देत किराणा बाजारपेठ, भांड्यांसह धान्याची बाजारपेठ बंद ठेवली. रॅलीत सहभागी विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी दहशत वाद्यांविरुद्ध कठोर कारवाई बाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले . अशा संकटाच्या वेळी आम्ही देशासोबत आहोत. जात, धर्म, पंथ महत्त्वाचे नसून, देश महत्त्वाचा आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशत वाद्यांनी केलेले कृत्य हे भ्याडपणाचे, माणुसकीला काळीमा फासणारे आहे, असे त्यात म्हटले होते.
श्रद्धांजली सभेसह रॅलीत संघटनांचा होता सहभाग विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू हुंकार संघटना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू क्रांती संघटना, हिंदू जनजागृती, राष्ट्रीय बजरंग दल, श्री राम सेना, हिंदू सूर्य प्रतिष्ठान, करणी सेना, हिंदू युवा वाहिनी, हिंदू महासभा, हिंदू क्रांती संघटना, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी, सनातन संस्था, सर्व हिंदुत्ववादी संघटना श्रद्धांजली सभा, रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
महानगर चेंबरच्या आवाहनाला सर्व व्यापारी संघटनांचा प्रतिसाद