श्रीरामपूर मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर शहरात लावलेल्या फलकावरून भाजप पक्षात नवे वांदग उठले आहे. ही निवड प्रक्रिया राबवताना पक्षातील जुन्या निष्ठावतांना विचारात न घेतल्याने या वादाला तोंड फुटले. या मुद्द्यावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी टोलेबाजी केली. भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या लोकांनीच ही बॅनरबाजी केली. आम्ही त्याला जास्त महत्व देत नाही. जे कायमच अंसतुष्ट राहिले, त्यांना आम्ही संतुष्ट करू शकत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भाजपच्या नवीन मंडळ अध्यक्षांनी गाव-वस्ती चलो अभियान राबवण्याचे आवाहन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण केले. शिर्डीत प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप संघटन पर्व, गाव-वस्ती चलो अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान परिषद सभापती राम शिंदे, संघटन मंत्री रवींद्र अनासपूरे, विक्रम पाटील, विजय चौधरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, राजेंद्र गोंदकर, नितीन दिनकर, नितीन कापसे, शिर्डीचे नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष रवींद्र गोंदकर, सचिन तांबे आदी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले, की भाजपच्या नवीन मंडळाध्यक्षांनी गाव-वस्ती चलो अभियान राबवावे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे, असे सांगितले.