महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…
.
भिवंडीतील कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग
भिवंडीतील मणी सुरत कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईच्या लोखंडवाला परिसरातील इमारतीतील घराला भीषण आग
मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरभीषण आग लागली. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे.
धर्म विचारुनच दुकानातून सामान विकत घ्या- नितेश राणे
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. “दुकानदाराला हनूमान चालीसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका” असेही राणे म्हणाले.
हिंगोलीत हजार रुपयांसाठी भावावर चाकूने वार
कळमनुरीमधील पेठवडगाव येथे उसने दिलेल्या 1000 रुपयांच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्याखाली चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मोठा भाऊ व त्याच्या पत्नीवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 26 गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा