Neelam Gorhe on Skill development schemes benefit society | कौशल्य विकास योजनांचा समाजाला फायदा: नीलम गोऱ्हे यांचा दावा; एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार – Pune News

0



शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबविल्या जाणार्‍या योजनेतून समाजाला चांगले फलित मिळतात. त्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात.” असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्

.

यावेळी अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार हे होते. तसेच युनेस्को युनिवोकचे फेडरिक युब्लर, लडाख येथील एचआयएचे संस्थापक संचालक सोनम वांगचुक, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग व सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार हे उपस्थित होते.

जागतिक शिक्षणाचे आदान प्रदान करणे, नाविण्यपूर्ण शिक्षणाची पद्धती व क्षमता निर्माण करण्यासाठी एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पहलगाममधील दुखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली.

डॉ.निलम गोर्‍हे म्हणाल्या,महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यातील कौशल्या गुणांना अधिक वाव दयावा. त्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देने काळाची गरज आहे. समाजात त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. तसेच शाश्वत विकासासाठी ग्रामिण क्षेत्रातील पर्यावरण, जल आणि आरोग्यासाठी कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे.

सोनम वांगचुक म्हणाले,शिक्षण क्षेत्रातील एआय व इंटरनेट गोष्टीने संपूर्ण जग बदलल आहेे. जुन्या काळात शिकण्याची पद्धत ही सर्वोत्तम असल्याने बुद्धीमत्तला अधिक जोर दयावा लागत असे. जीवनात प्रात्यक्षित शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण महत्वाचे आहे. हे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅन पॉवरची गरज आहे. नवी शिक्षण पद्धती खूप चांगली असली तरी त्याचे प्रात्यक्षात उतरणे महत्वाचे आहे. विद्यापीठ हे केवळ माहितीचे स्त्रोत राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षण पद्धतीत बदल घडावे. अत्याधुनिक काळात शिक्षकांनी स्वतःची भूमिका बदलने गरजेचे आहे. भविष्यात ब्राइट हेड, स्किल हॅन्ड आणि हार्ट या तीन गोष्टी सर्वात महत्वाचे असतील. प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ हे कौशल्यपूर्ण असावे.

डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले, युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तर रोजगार त्यांच्याकडे येईल. वर्तमानकाळात इंडस्ट्री आणि विद्यापीठामध्ये योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग केला पाहिजे. देश प्रगतीसाठी महिला सशक्तीकरण सर्वात महत्वाचे आहे.

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, विकसित भारत बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्किल इंडिया व मेक इंन इंडियाच्या धर्तीवर विद्यापीठाने पाऊले उचलीत आहेत. विकसीत भारतासाठी या विद्यापीठाचे खूप मोठे योगदान आहे. सक्षम महिला सक्षम समाज यानुसार महिलांच्या विकासावर भर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या ५ वर्षात हजारो महिलांना भविष्यातील कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य कर्मचारी देण्यावर अधिक भर देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here